देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
अज्ञात भामट्याने रात्रीच्या दरम्यान डाळींबाच्या बागेतील २ लाख २५ हजार रुपयांचे डाळींब चोरुन नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील धानोरे येथे दि. १५ जूलै रोजी सकाळी उघडकीस आली.
चेतन गोरक्ष दिघे, वय ३२ वर्षे, रा. धानोरे, ता. राहुरी, यांनी धानोरे येथील हेमंत बाळासाहेब पिंपळे यांची शेती करायला घेतली असुन त्यात शेतात त्यांनी १ हजार ५०० डाळींबाची झाडे लावलेली आहे.
दि. १४ जूलै रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान चेतन दिघे यांनी डाळींबाच्या फळांची पाहणी करुन घरी गेले. त्यानंतर ते दि. १५ जूलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात डाळींबाच्या फळांची पाहणी करण्या करीता गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १३० कॅरेट डाळींब चोरुन नेले. चेतन गोरक्ष दिघे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. ८१६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आला.