सिप्ला कंपनीमधून 11 लाखांची कॉपर केबल ड्रम चोरी …

0

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

दौड रावणगाव (परशुराम निखळे): दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सिप्ला फार्मासिटीकल कंपनीमधून अकरा लाखांची कॉपर केबल ड्रम चोरी गेल्याची घटना घडलीय.

 याबाबत सिप्ला फार्मासिटिकल कंपनीचे असिस्टंट डायरेक्टर रमेश नटवर्टी राघवन. राहणार- गोपाळवाडी, दौंड यांनी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केलीय.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सिप्ला या कंपनीमध्ये कंपनीचे नवीन बिल्डिंग चे काम चालू असल्याने त्यासाठी ते वायरिंग साठी ५८ केबल कॉपर वायर ड्रम कंपनीच्या आवारामध्ये कंपाऊंडच्या बाजूला एका जागी ठेवले होते. परंतु त्यामधील दहा ड्रम हे चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .

सदर ठिकाणी पाहणी केली असता काही केबल ड्रम त्या ठिकाणी नाहीच असे दिसल्यास कंपनीमध्ये आजूबाजूच्या परिसरात राघवन यांनी काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या परिसरात शोध घेतला असता त्या ठिकाणी केबल ड्रम दिसून आले नाही. म्हणून त्यांची खात्री झाली की अठ्ठावन्न केबल पैकी दहा ड्रम केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले असल्याचे दिसले. यामध्ये दोन लाख नऊशे अडुसष्ट रुपये किमतीचे सहा कोअर एक स्केयर एम.एम सिग्नल कॉपर एक ड्रम वायर व पाच लाख तीनशे चौर्येंशी किमतीचा एक कोअर 25 स्केयर एमएम अर्थिंग ग्रीन केबल कोपर दोन ड्रम वायर तसेच एक लाख पाचशे अडुसष्ट रुपये किमतीचे एक कोअर 25 स्केयर एम.एम अर्थिंग ग्रीन एलो केबल कॉपर एक ड्रम वायर तसेच दोन लाख नऊहजार नऊशे  किमतीची एक  केअर एम. एम अर्थिंग केबल कॉपर सहा ड्रम वायर असा दहा लाख 98 हजार 820 रुपये किमतीचे अर्थिंग केबल कोपर व ॲल्युमिनियम वायर असा दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी ते २ सप्टेंबर २४ पर्यंत चोरी झाले असावे. म्हणून याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. सदरचा तपास दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कुरकुंभ पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करत आहे.

सिप्ला कंपनीची सुरक्षा रक्षक इतके तैनात असतात की जणू बॉर्डर वर जवान तैनात असतात तसे तैनात असतात कारण कामगार कंपनीच्या गेटवर आले की त्यांची कसून तपासून कंपनीत पाठवले जाते मंग चोरी झाली कशी असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here