३६ मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जामखेड पोलीसांनी केले जेरबंद

0

१० लाख ३५ हजार किंमतीचा मुददेमाल हस्तगत.  पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

जामखेड तालुका प्रतिनिधी –   जामखेड पोलिसांनी  ३६ मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जामखेड पोलीसांनी जेरबंद करत दहा लाख ३५,हजार  किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

                      पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि,  दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी आठ वा. चे सुमारास जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत जामखेड शहर बीटचे पोलीस अंमलदार पोकॉ. कुलदिप घोळवे व पोकॉ. भगिरथ देशमाने असे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना बसस्थानक जामखेड या ठिकाणी भेट देणेसाठी गेले असता एक इसम बसस्थानकावर दुचाकी  पार्किंग केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयीत रित्या बिगर नंबर प्लेट मोटर सायकलवर फिरताना दिसला असता,  त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव बाबासाहेब खेडकर रा. माहिजळगाव ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गाडीच्या नंबर प्लेट व कागदपत्राबाबत विचारपुस केली, त्यावेळेस  तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला,  त्यावेळी त्याचा संशय आल्याने पोलीस पथक बोलावुन त्यास चौकशी कामी ताब्यात घेतले.  

                   

जामखेड पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे अधिक चौकशी करत  त्याचेकडे मोटार सायकली चोरी विषयी चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी व माझा मित्र सुधिर शहाजी सुरवसे रा. माहिजळगाव ता. कर्जत असे आम्ही सध्या कामधंदा करत नसल्याने आम्हाला दारु पिण्याकरीता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने आम्ही जामखेड, श्रीगोंदा, कर्जत व इतर जिल्हयातील गर्दीच्या ठिकाणावरुन, बस स्थानक परीसरातुन तसेच बाजारातुन काही मोटार सायकली चोरी केलेल्या असलेबाबत सांगितले. त्यांचेकडे चोरलेल्या मोटार सायकलबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही चोरलेल्या मोटार सायकल काही दिवस वापरल्या होत्या व त्यानंतर आमचे नातेवाईकांना व ओळखीचे लोकांना खोटे सांगितले की, आम्ही फायनन्स कंपनी मध्ये काम करत असुन आमच्या कंपनीने ओढुन आणलेल्या मोटर सायकली आमच्याकडे आहेत. असे खोटे बोलुन आम्ही काही मोटार सायकल ओळखीचे लोकांना व नातेवाईकांना विकल्या आहेत व काही वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवलेल्या असुन मी त्यांची विक्री करीता ग्राहक शोधत आहे. असे सांगितल्याने पोलीस पथकाने तात्काळ माहिजळगाव ता. कर्जत येथे जावुन त्याचा मित्र आरोपी  सुधिर शहाजी सुरवसे यास ताब्यात घेतले.

         

सदरची कारवाई ही  राकेश ओला  पोलीस अधिक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि. वर्षा जाधव, जामखेड शहर बीटाचे अंमलदार पोहेकॉ/प्रविण इंगळे, पोना. संतोष कोपनर, पोना. जितेंद्र सरोदे, पोकॉ. प्रकाश मांडगे, पोकॉ. कुलदिप घोळवे, पोकॉ. देविदास पळसे, पोकॉ. ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ. भगिरथ देशमाने, पोकॉ. जिब्राईल शेख व सायबर सेलचे पोकॉ. नितीन शिंदे व पोकॉ. राहुल गुंडु यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here