सातारा/अनिल वीर : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा निमित्ताने त्रिरश्मी सामाजिक विकास संस्थेच्यावतीने विश्व वंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करुन चंद्रमणी बुद्ध विहार ढेबेवाडी,ता.पाटण या ठिकाणी वर्षावासास प्रारंभ करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभा ३२ गाव ढेबेवाडी माजी विभागाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, उपासक आप्पासाहेब कांबळे, माजी सचिव सुरेश माने, दिनकर साखरे,दिनकर नांगरे, घनश्याम कांबळे आदी उपासिका-उपासक उपस्थित होते.