चक्क शाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आरपीआयच्या कार्यकर्त्यानी भरवली !

0

सातारा/अनिल वीर : RPI आरपीआय तथा रिपाइं (आठवले गट) यांच्या कार्यकर्त्यांनी बोबडे बोल बोलत आणि उड्या मारतच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. आणि चक्क शाळाच भरवली.

           वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा.अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच हे आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी खाकी हाफ पैंट आणि पांढरा शर्ट परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनीच समक्ष भेटून निवेदन स्वीकारावे. असा आग्रह धरला होता. जिल्हाधिकारी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर सर्वानी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच ठिय्या मांडला होता. काही वेळाने व्हीसी संपवून जिल्हाधिकारी जितेन्द्र डूडी आले. यानंतर त्यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.

आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे. हे शिक्षण दत्तक देण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय संविधान विरोधी असून सर्वसामान्य वंचित मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे. सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नाही. तर मग सरकारचा काय उपयोग? हे मातृत्व अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संविधान विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा.अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष आप्पा तुपे,जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे,वैभव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनास सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here