जिल्ह्यात समता सैनिक दलाचे दि.२८ रोजी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौध्द महासभेचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर,ट्रस्टी-चेअरमन डॉ. हरिष रावलिया, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.ऍड.भिमराव आंबेडकर यांच्या विचारांनुसार जिल्ह्यात दि.२८ रोजी एकदिवसीय समता सैनिक दल शिबिरे आयोजित करावेत.असे आवाहन पश्चिम विभागीय जिल्हा सरचिटणीस उदय भंडारे यांनी केले आहे.

   जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, सरचिटणीस,सर्व तालुका शाखा व  जिल्हा यांनी शिबिर राबविण्याबाबत केंद्रीय बैठकीतील ठरावयानुसार कार्यवाही करावी.भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष,समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर यांच्या निर्देशानुसार त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती वर्ष व समता सैनिक दलाचे ९६ व्या वर्धापन वर्षानिमित्त रविवार दि.२८ रोजी सर्व तालुका शाखांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एक दिवशीय समता सैनिक शिबिराचे आयोजन करण्याचे सक्त निर्देश सदर पत्राद्वारे देण्यात येत आहेत. आपल्या तालुका शाखेत यापूर्वी प्रशिक्षित झालेले/ नावे नोंदवलेले व नव्याने नोंदणी केलेल्या शिबिरार्थींचा यात समावेश करावा.जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस व उपाध्यक्ष(समता सैनिक दल) यांनी तातडीने सदर शिबिरांची कार्यवाही करावी.असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here