सातारा : अध्ययनार्थींच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक अशा एकूणच सर्वांगीण विकासाला अथवा क्षमतेला प्रबळ करण्यासाठी या संपूर्ण विश्वात तुम्हीच तुमची सुपर पॉवर आहात.तेव्हा ज्ञानाची मिळालेली शिदोरी आयुष्यभर पुरणार आहे.असे प्रतिपादन प्रतिज्ञा रुमडे यांनी केले.
आंबवडे सं.ता.कोरेगाव येथील मॉडर्न इंग्लिश स्कुलमध्ये, “भारतीय फॉर विकसित भारत (युवाशक्ती)” या विषयावर लेखिका प्रतिज्ञा रुमडे मार्गदर्शन करीत होत्या.अध्यक्षस्थानी वसना पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश सकुंडे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर उपस्थीत होते.यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मोहन सकुंडे व सौ.सुवर्णा जगनाथ चव्हाण उपस्थीत होते.
प्रतिज्ञा रुमडे (माईंडसेट अल्केमिस्ट) म्हणाल्या,”मानवाने सुसंवाद साधला पाहिजे. आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही.अगदी काहीही झाले तरी शरणागती पत्करून परिस्थिती पावली माथा टेकवू नये.अन अगदीच तसा काळ सोकावला तर त्या काळाच्या नाकावर टिच्चून तुला हवे ते साध्य करण्याचे कौशल्य , किमया अन क्षमता ही ढालरूपी शस्त्रे तुला वरदान आहेतच. याचे स्मरण सदैव असावे.” असा मोलाचा आणि यशाचा मार्ग व्याख्यानामार्फत प्रतिज्ञा (माईंडसेट अल्केमिस्ट) यांनी सांगितला. अन अशा उत्स्फुर्त व्याख्यानाला मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला.
मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांनी प्रास्ताविकपर म्हणाले, “आयोजित केलेल्या आगळ्या – वेगळ्या उपक्रमामुळे शाळा आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू पाहत आहे. तसेच मुख्यतः विद्यार्थ्यांच्या मानसिक अन भावनिक आरोग्याप्रती कटिबद्ध राहण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न इथे शाळा मुलांसाठी करू पाहत आहे आणि हे स्वागतार्ह आहे.”यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
आपण ज्या समाजात राहतो. त्याचे आपण काही देणे लागतो. या आशयाला समर्पून प्रतिज्ञा रुमडे यांचे आई-वडील श्री प्रकाश रुमडे – सौ. प्रणाली रुमडे आणि मामा-मामी जगन्नाथ चव्हाण – सौ. सुवर्णा चव्हाण यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना रु.७५ हजार किमतीच्या वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी,मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विकास लादे यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे संचालक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व अध्ययनार्थी उपस्थित होते.