सातारा/अनिल वीर : येथील डी. टी.गायकवाड यांनी सुमारे ४० वर्षे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत.त्या प्रित्यर्थ सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा बुधवार दि.४ रोजी दुपारी १ वा.अक्षता मंगल कार्यालयात घेण्यात येणार आहे.तेव्हा संबंधितांनी उपस्थित राहुन शुभेच्छा द्याव्यात.अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
डी.टी.गायकवाड आता शासकीय नोकरीतून निवृत्त झाले आहेत. कौटुंबीक वारसा समाजसेवेसह राजकीय असल्याने सेवानिवृत्तीनंतरची दुसरी इनिंग ते नक्कीच स्वत:चे आरोग्य सांभाळून करतील. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांचे बंधू असून युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक व राजेश यांचे वडील आहेत.त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल कशी असेल? हे आपसुकच स्पष्ट होत आहे.
शासन सेवेत काम करत असताना त्यांना माजी सा.बां. सचिव आर.टी.अत्रे, व्ही.सी.राणे, एन.व्ही.मेरानी,ए.जी.बोरकर, मुख्य अभियंता,ए.जी.पोळ,व्ही. एन.देशपांडे,यु.एस.कलगुटकर,आर.आर.चोंकर,डी.के.कान्हेरे,ए.जे.जगताप तसेच मुख्य अभियंता मा.एस.एन. राजभोज,आर.पी. निघोट, एल.एन.वाघमोडे आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून त्यांचाकडे काम करण्याची संधी प्राप्त झाली होती.त्यामुळे डी.टी.साहेब कायमस्वरूपी अधिकारी व सहकारी यांच्या ऋणातच राहणार आहेत.