सातारा : कोलकत्ता येथे झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवती वरती जो अन्याय अत्याचार झाला तो नराधम संजय राय यास फासावर लटकावावे.शिवाय,बदलापूर येथील ३ वर्षे ८ महिन्याची असणारी एक व दुसरी ६ वर्षांची असणाऱ्या मुलीवर शाळेत असणाऱ्या सफाई कामगार (शिपाई) अक्षय शिंदे या निच नराधमाने अमानुषरित्या लैंगिक अत्याचार छळ करून अतिप्रसंग केला आहे.ही घटना बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये घडलेली आहे. दहिवडी येथील शिखर शिंगणापूर डोंगरामध्ये आपल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाससुद्धा फासावर लटकावले पाहिजे.अशा अनेक घटनांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जाहीर निषेध करून सम्बधितांना त्वरित कठोरात कठोर शिक्षा करावी. अन्यथा,आमच्या ताब्यात द्यावे. अशी मागणी राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिपकभाऊ निकाळजे गटातर्फे अर्थात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्यावतीने निषेध-आंदोलन करण्यात आले.तेव्हा ओव्हाळ बोलत होते,”महिला,अबला व लहान मुलींवरती अन्याय-अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फासावर लटकावा ! अन्यथा, प्रशासनाने आम्हाला म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांना थोडीशी सवलत द्यावी. मग अशा नराधमाचा बंदोबस्त आम्ही करू. आणि त्यांना भर चौकात पेटवून देऊ !”
एकंदरच संपूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक तसेच महिला व लहान मुली सुद्धा असुरक्षित आहेत. त्यामुळे अशा घटना या फक्त आणि फक्त काही जणांच्या पाठबळावरती घडत आहेत. त्यामुळे पाठबळ देणाऱ्यानाही दोषी ठरवून त्यांना सुद्धा कायमस्वरूपी जेरबंद केले पाहिजे. तसेच गुन्हा करणाऱ्यांना खटला तात्काळ फास्ट ट्रॅकवरती चालवून फासावर लटकवले पाहिजे.”येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.होणाऱ्या परिणामास शासन – प्रशासन जबाबदार राहील.” असेही जिल्हाउपाध्यक्ष किरण बगाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यवतीने जाहीर केले आहे.सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.सदरच्या निवेदनावर सोमनाथ धोत्रे,रामभाऊ मदाळे, सलीम बागवान,विशाल भोसले, सलीम शेख,मदन खंकाळ,प्रदीप कांबळे,सुशांत तुपे आदींच्या स्वाक्षरी आहेत.