निढळ येथील गंगापूजनाचा सामुदायिक कार्यक्रम उत्साहात संपन्न 

0

पुसेगाव, पंकज कदम :

निढळ ता खटाव येथे निढळ ग्रामस्थांनी सामुदायिक गंगापूजन केले . निढळ येथून प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी १५ ग्रामस्थ  गेले होते . त्यांनी त्या ठिकाणी गंगास्नान करून गावी आल्यावर सामुदायिक गंगापूजन केले .यावेळी गावचे ग्रामदैवत श्री निलकंठेश्वर महादेव मंदीरात गंगाजलाने अभिषेक करण्यात आला .त्यानंतर विधिवत गंगापूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे पौरोहित्य निढळ चे प्रसिद्ध पुरोहित विलास कुलकर्णी यांनी केले .त्यांतर या गंगाजलाची गावातून वाजत गाजत ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली . यावेळी ग्रामस्थां मध्ये मोठा उत्साह दिसून आला.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला . या यात्रेमध्ये निढळ मधील दोन्ही राजकीय गटातील कार्यकर्ते होते .निढळ मधील धार्मिक सामाजिक कार्यक्रमात आम्ही राजकीय गट  तट विसरून काम करतो .आमचे राजकिय मतभेद कितीही असू देत पण ते आम्ही वैयक्तिक मैत्रीत घेत नाही .राजकारण राजकारण च्या जागेवर ,मैत्री मैत्री च्या जागेवर . अशी माहिती निढळ सोसायटीचे चे चेअरमन भीमराव माने यांनी दिली.यावेळी निढळ गावच्या सरपंच सौ रेखा घाडगे ,श्रीकांत खुस्पे ,  यशवंत जाधव,भीमराव माने,ताया खुस्पे, अशोक सत्रे,शशिकांत दळवी,ज्ञानेश्वर वसव,अमित खुस्पे,विष्णू पवार,विजय शिंदे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here