सातारा : झूट बोले कौआ काटे…. या गाण्याप्रमाणे झुटीचा साफसफाई करता येईल.मात्र, सत्ताधारी फूट व लूट थांबवत नाहीत. तेव्हा भाजपा महायुतीचे सरकार लटकल्याने महाविकास आधाडीला चागले दिवस येणार आहेत.असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे युगेंद्र यादव यांनी केले. येथील मुक्तांगण येथे जावली-सातारा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत भारत जोडो अभियानाचे आणि स्वयंसेवी संस्था संघटनांचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव मार्गदर्शन करीत होते.यावेळी महाराष्ट्राच्या समन्वयक उल्का महाजन आणि आंबेडकरी विचारांचे जेष्ठ नेते ललित बाबर उपस्थित होते.
योगेंद्र यादव म्हणाले,”७० वर्षात एवढा झूट पंतप्रधान आपण पाहिला नाही.भाजच्या मनात सतत भूत असते. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान यांचा इमानेइतबारे कारभार राज्यात चालवत आहेत.अक्षरशः १० वर्षे झाली सत्ताधारी यांनी जनतेची लयलूटच केली आहे.अंनिस देशाचे मॉडेल आहे.डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंनिसच्या माध्यमातून जे कार्य केले आहे.तेव्हा त्यांच्या विचारांचा देश घडला पाहिजे. तेव्हा परिवर्तन करणे गरजेचे आहे.”
उल्का महाजन म्हणाल्या, “सर्वसामावेशक अस्मितेची निवडणूक असल्याने महाविकास आघाडीला एकजुटीने मतदान केले पाहिजे.” ललित बाबर म्हणाले, “लोकशाहीच्या उत्साहास सुरुवात झाली आहे.तेव्हा महाविकास आघाडीस निवडून दिले पाहिजे.देशासाठी धर्मनिरपेक्षपणे काम करीत आहोत.धोरणात्मक अपेक्षेने आम्ही संविधानाचे रक्षण करीत आहोत. तरीही उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आम्हास नक्षलवादी म्हणत आहेत. सामाजिक लढ्यासाठी लढा देत आहे.तेव्हा ओबीसींचे खरे शत्रू कोण ? याबाबतही विचार केला पाहिजे.लोकसभेत चारशेपार रोखण्यासाठी भाजपला अपयश आले होते.(दोन कुबड्यावर भाजप सरकार कसेतरी आलेले आहे.) त्यात महाराष्ट्राचाही वाटा आहे.दिल्लीचे तख्तही महाराष्ट्र हलवते.याचीही प्रचिती लोकसभेला दिली होती.तशीच विधासभेमध्ये आढळुन येईल.जिहाद, भूक,भ्रम,लाचार आदीचे भय वैगरे दाखवून भाजपा अन्याय-अत्याचार करीत आहे.त्यांची कथनी एक व करणी एक असे काम आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आहे.(लोकसभेत महाराष्ट्रात पराभव झाल्याने महायुती भयभीत झाली होती.)मताची झाली कडकी म्हणूनच लाडकी बहीण आठवली.”
उमेदवार अमित कदम म्हणाले,”सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे.सत्ता व पैसा ही द्विसूत्री रचनेद्वारे भाजपा राजकारण करीत आहे.सत्ताधारी ठेकेदार यांच्याकडून पुनःपुन्हा तीच तीच कामे करून घेत आहेत.काही ठिकाणी डाम्बरी रस्त्यात गवत उगवून आलेले आपण पाहिले आहे.” यावेळी काँग्रेसच्या सौ.रजनी पवार व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. मशाल पेटवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.ऍड.वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, पत्रकार व महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.