बिहार पॅटर्नप्रमाणे जनगणना करूनच निवडणुका घ्याव्यात  मुख्यमंत्री यांना ओबीसीतर्फे साकडे!

0

सातारा : ओबीसी OBC समाजाची बिहारच्या पटर्नप्रमाणे जनगणना करावी.त्यानंतरच विधानसभा, लोकसभा आदी निवडणुका घ्याव्यात.अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले असुन त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ओबीसी समाजाचा इतर कोणत्याही जातीमध्ये समावेश न करता लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळावा.त्यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी आग्रही करण्यात येत आहे. आपसुकच आगामी निवडणुकात हक्काचे प्रातिनिधित्व मिळेल. याशिवाय,राज्यात कंत्राटिकरण पद्धतीचा अवलंब करून भरती केली जात आहे.जर ही पद्धत बंद केली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.तेव्हा शिक्षण व इतर नोकऱ्यातील कंत्राटिकरणामुळे वाटोळे करीत असलेल्या राज्याचा जाहीर निषेध  करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर,सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह प्रकाश खटावकर,भगवान अवघडे,गणेश सुतार,माधवराव लोहार,शंकर जाधव,गोपाळ शिंदे,अनिल वीर आदींच्याही निवेदनावर स्वाक्षरी आहेत. समारोप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here