सातारा/अनिल वीर : दि बुध्दिस्ट सोसायटी आँफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा), तालुका-महाबळेश्वर यांच्यावतीने वर्षावास प्रवचन मालिका सुरू होत आहेत. सन – २०२४ आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा प्रबोधन मालिकेचे पहिले पुष्प कार्यक्रम रविवार दि.२१ रोजी बौध्दजन मंडळ,तापोळा येथे संस्कार उपाध्यक्ष प्रकाश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली व संस्कार सचिव रवींद्र घाडगे व आनंद सपकाळ यांच्या नियोजनाखाली होणार आहे.
यावेळी शाखा क्रमांक ४ चे अध्यक्ष दिलीप कांबळे, सचिव धोंडीबा पवार तसेच भारतीय बौद्ध महासभा, भीम क्रांती युवक संघटना,माजी श्रामनेर, बौद्धचार्य संघटना, समता सैनिक दल,सर्व शाखा – अध्यक्ष,सचिव व संपुर्ण कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मार्गदर्शक,धम्मबांधव व भगिनीनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहणार आहेत.यावेळी वर्षावासाचे महत्व प्रवचनकार तालुका संस्कार उपाध्यक्ष प्रकाश रामचंद्र सपकाळ विशद करणार आहेत. तेव्हा सर्व उपासक-उपासीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष नितीन गायकवाड, महासचिव अनिल सपकाळ, कोषाध्यक्ष, एकनाथ भालेराव आणि सर्व पदाधिकारी आणि भीम क्रांती युवक संघटनचे अध्यक्ष संतोष भालेराव व रवींद्र जाधव, महासचिव जगन कदम,सचिव शरद कदम आणि संपुर्ण कार्यकारिणी यांनी केले आहे.
दि.२१ पासून वर्षावास प्रबोधन मालिका गावोगावी सुरू होत असुन गुरुवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सांगता समारोह होणार आहे.यासाठी शाखा क्र.१,२,३ व ४ अथक असे परिश्रम घेत आहे.