सातारा/अनिल वीर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रमाता रमाई यांचा स्मृतीदिन शनिवार दि.२७ रोजी सकाळी १०.३० वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरातील सांस्कृतीक सभामंडपाच्या प्रांगणात सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.धम्म वंदना व सुत्तपठन होईल.गायनाचा कार्यक्रम जेष्ठ नागरीक संघ यांच्यावतीने होईल. महीला मंडळ यांच्यावतीने गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.तेव्हा सर्व फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या संघटना,पक्ष, जेष्ठनागरिक संघ,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल, महिला मंडळ तसेच संयुक्त जयंती समारोह समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे.