राजर्षी शाहू महाराजांचे योगदानावर  बुधवारी व्याख्यान

0

सातारा/अनिल वीर : नवसमाज रचनेचे शिल्पकार लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त विशेष व्याख्यान बुधवार दि.२६ रोजी सायंकाळी सहा वाजता पाठक हॉलमध्ये आयोजित केले आहे, अशी माहिती संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

      राजर्षी शाहू महाराज यांचे आधुनिक समाज निर्मितीचे योगदान अतिशय मोलाचे आहे. ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. या हेतूने संबोधी प्रतिष्ठानचे वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान” या विषयावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.या प्रसंगी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाच्या शताब्दी वर्षा निमित्त लंडन येथे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झालेले रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे डॉ. सुभाष वाघमारे,लेफ्टनंट डॉ .केशव पवार व प्रा.तानाजी देवकुळे या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.तेव्हा सदरच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहनकार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह अनिल बनसोडे, कोषाध्यक्ष केशवराव कदम,संस्थापक सदस्य प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे, डॉ. सुवर्णा विनोद यादव, प्रा. प्रशांत साळवे, यशपाल बनसोडे व प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here