गोंदवले – नातेपुते ता.माळशिरस येथील कु.ओवी चंद्रकांत ढालपे हिने अर्णव क्रिएशन इंटरनॅशनल अबॅकस आणि मानसिक अंकगणित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे. त्याबद्दल तिला सन्मानित व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
ओवी ची इंटरनॅशनल स्तरावर अबॅकस स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड करण्यात आली आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे संपूर्ण परिसरातुन कौतुक होत आहे. चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटी मध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत कमी वेळात जास्तीत जास्त गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे . चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीमध्ये अर्णव क्रिएशन इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये कु.ओवी चंद्रकांत ढालपे कु. क्रिशा अभिजीत भिसे कु.श्रीशा ज्ञानराज पाटील चि.तन्मय बनकर या विद्यार्थ्यांचीं यासाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना प्रिया कुलकर्णी टीचर आणि स्वाती सर्जै टीचर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.