अनिल वीर सातारा : लोकसभेच्या निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद रिक्तच होते.हंगामी जिल्हाध्यक्षपदी येथील शहराध्यक्ष मिलिंदभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाली आहे.
रिक्त पद झाल्यापासून वंचित अंतर्गत गट बाजी चालु होती. जिल्हाध्यक्ष पदाबाबत जिल्हा अंतर्गत अनेक बैठका होत होत्या. प्रदेश पातळीवर सर्व घडामोडींची दखल घेऊन उशिरा का होईना हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून मिलिंदभाऊ यांची नियुक्ति झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.