सातारा/अनिल वीर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त शाहु बोर्डिंग येथे अध्ययनार्थीना खाऊ वाटप करून अनोख्ये असे अभिवादन करण्यात आले. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व शाहु बोर्डिंगमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रिपब्लिकन सेना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, “पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकरी लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतेय काहीली !या ओळीत दीन- दलित, मजूर, बहुजन वर्गाच्या व्यवस्था परिवर्तनाचा विडा उचलून त्यासाठी संपूर्ण आयुष्य लेखणीच्या माध्यमातून झिजवणाऱ्या, ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन करत, संघर्षाचा अंगार आपल्या साहित्य कृतीतून रेखाटण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते.”
यावेळी रिपब्लिकन सेना प.महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,पदाधिकारी,कार्यकर्ते, विविध संघटनेतील प्रतिनिधी, अनेक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, दादासाहेब केंगार, बंधुत्व आदर्श गायिका कल्पना कांबळे,विश्वास सावंत,श्रीरंग वाघमारे, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.