अनिल वीर सातारा : भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसन्मान परिषद दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत “ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मैदान,आरटीओ ऑफिस शेजारी,पुणे” येथे होणार आहे.
या शिवसन्मान परिषदेचे नेतृत्व तथा अध्यक्ष वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष,भारत मुक्ती मोर्चा,नवी दिल्ली) हे करणार असून परिषदेचे नेतृत्व तथा विशेष अतिथी म्हणून प्रविणदादा गायकवाड (प्रदेशाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड) उपस्थित रहाणार आहेत. उद्घाटक डॉ.बाबा आढाव (संस्थापक,हमाल पंचायत, महाराष्ट्र) हे आहेत.
यावेळी ज्येष्ट इतिहासकार मा.म.देशमुख, ज्ञानेश महाराव (संपादक, साप्ताहिक चित्रलेखा),किरण माने (प्रसिद्ध सिने अभिनेते),श्रीमंत कोकाटे (प्रसिद्ध इतिहास संशोधक), प्रदिपदादा सोळुंके (प्रसिद्ध व्याख्याते, महाराष्ट्र) व अमरजित पाटील (शिवचरित्र अभ्यासक, महाराष्ट्र) या परिषदेला विशेष अतिथी म्हणुन उपस्थित रहातील.
या शिवसन्मान परिषदेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरुष यांची हत्या, ब्राम्हणीकरण, चरित्रहनन व स्मारकांची विटंबना या मागील ब्राम्हणी षडयंत्र—-एक गंभीर चिंतन,घाई गडबडीत पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार करुन शिवसन्मान न करता त्याचा निवडणुकीत वापर करुन ब्राम्हणी राज्य उभारणीचे आरआरएस भाजप सरकारचे षडयंत्र—एक चर्चा अथवा आरआरएस आणि ब्राम्हणी छावणीचे लोक ब्राम्हणी वर्चस्व आणि राज्य स्थापन करण्यासाठी बहुजन महापुरुषांचा सन्मान न करता त्यांच्या नावाचा केवळ वापर करीत आहेत – एक विचार मंथन या गंभीर विषयांवर महाराष्ट्रातील विद्वान मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.तेव्हा सदरच्या महत्वपुर्ण अशा “शिवसन्मान परिषदेला” महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेने उपस्थित रहावे.असे आवाहन किशोर तुपारे,प्रशांत कुंजीर,संतोष हगवणे,निखिल गडकर,प्रा.अर्जुनओहाळ या भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.