गोंदवले –31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची मौखिक तपासणी करण्यात आली. सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत तंबाखूचे दुष्परिणाम विषयी पोस्टर्स व सापशिडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यामार्फत सायकल रॅली व भारती विद्यापीठ व निर्मल व्यसनमुक्ती केंद्र यांच्यामार्फत सांगली बस डेपो मध्ये पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तंबाखू विरोधी जनजागृती चे काम एनजीओ च्या मार्फत करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे सर्व टीम उपस्थित होते.