सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभेतर्फे येथील डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये शनिवार दि.२७ रोजी माता रमाई स्मृतिदिन व समता सैनिक दलाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (मिलिंद सोसायटी), सातारा येथे माता रमाई स्मृती दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.याशिवाय, समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमीत्त समता सैनिक दल एकदिवशिय प्रशिक्षण शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. तरी समता सैनिक दलामध्ये सहभागी होणाऱ्या सैनिकांनी शिबीरास वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी,समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक,बौध्दाचार्य, केंद्रिय शिक्षक,शिक्षिका,माजी श्रामणेर व सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने व पदाधिकारी यांनी दिली.