सातारा येथे संविधान गौरव सभेचे  दि. २९ मे रोजी आयोजन

0

सातारा/अनिल वीर : कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक उद्यान सातारा स्टेडियम, एसटी स्टँड शिवाजी संग्रहालय समोर सातारा येथे संविधान गौरव सभेचे आयोजन सोमवार दि.२९ रोजी सायंकाळी ६ वा.करण्यात आले आहे.

      डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दिघे (कामगार नेते कोल्हापूर) उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

     यावेळी पथनाट्य,” इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो.” प्रा.राणी अवघडे आणि कलाकार सादर करणार आहेत.प्रारंभी,संविधान उददेशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. संविधान पोस्टर्स प्रदर्शनाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संविधान गीत जलसा शाहीर भानुदास गायकवाड व सहकारी सादर करणार आहेत.ज्येष्ठ कार्यकर्ता सत्कार सुभाष जाजू,पुंडलिक पाटोळे,प्रा.अण्णासाहेब होवळे व जनार्दन घाडगे यांचा होणार आहे.

प्रमुख वक्ते म्हणून वृषाली माने (मुंबई) व कॉ.किरण माने(सातारा) यांचाही समावेश आहे.याकामी,राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन,संविधान सन्मान यात्रा स्वागत समिती व कॉ. व्हि.एन.पाटील स्मारक उद्यान ट्रस्ट अथक असे परिश्रम घेत आहेत.अधिक माहितीसाठी

: ” 7083317189 व ईमेल awbhagwan15 @gmail.com” यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here