अनिल वीर सातारा : भ.बुद्ध व त्यांचे शिष्य सारीतपुत मोगलयन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु असलेला कलश रथ साताऱ्यात आल्याने बॉम्बे रेस्टॉरंट येथे फटाक्यांच्या आतिष बाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.
विदेशी पाहुण्यांना राज्य अतिथी घोषित करण्यात आल्यामुळे प्रशासनाने सर्व बाबतीत सहकार्य केले. कोणताही भेद दिसला नाही.सर्व संघटनेचे कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थीत होते.समीतीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली. सदरच्या दौऱ्यावेळी पोलीस संरक्षण व इतर अनुज्ञेय सुविधा प्रशासनाने दिली होती.यावेळी कृती समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी,सदस्य व प्रसिध्दीप्रमुख कार्यरत होते. तेव्हा विविध संघटनांचे प्रतिनिधी,उपासक व उपासिका यांनी स्वागतासाठी उपस्थीत होते. अस्थिकलशाचे स्वागत बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी झाल्यानंतर मिरवणुकीने डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात रवाना झाली.पुतळा परिसरात पालिकेच्यावतीने मंडप व सुशोभिकारण केले होते. पुतळा परिसरात अस्थीकलशचे दर्शनानंतर धम्मदेशनेचा कार्यक्रम संपन्न झाला.