साताऱ्यात वंचितर्फे दि.२६ रोजी वारसा लोकराजाचा सांगावा संविधानाचा कार्यक्रम

0

सातारा/अनिल वीर : आम्ही आरक्षणाचे समर्थक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर  यांच्या नेतृत्वाखाली दि.२६ जून रोजी संपूर्ण राज्यात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरले आहे.त्यामुळे येथील शाहु चौकात डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी १० वा.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी दिली आहे.

               वंचित बहुजन आघाडी आरक्षणाचे समर्थक आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची जयंती वारसा लोकराजाचा सांगावा संविधानाचा या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक न्याय जनसंवाद अभियान वंचीतच्या वतीने राबवणार येणार आहे.आरक्षणमुळे वंचित,दलीत,

पीडित समाज आज मुख्य प्रवाहामध्ये आला आहे/येत आहे.याची जाणीव ठेवून एस सी , एस टी , एन टी, ओबीसी यांचे आरक्षण अबाधित ठेवत गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. 

   २६ जून २०२४ रोजीचे उपक्रम : छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.छत्रपती शाहू महाराज यांचे आरक्षण विषयक धोरण विषयावर जाहीर परिसंवाद तसेच सामाजिक न्याय जनसंवाद अभियानाची भूमिका मांडणी होणार आहे.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील वंचीतच्या सर्व विंगचे (जनरल , महिला ,युवक , कामगार ,विद्यार्थी , फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा )जिल्हा अध्यक्ष त्यांची कार्यकारणी , तालुकाध्यक्ष त्यांची कार्यकारणी , शहर अध्यक्ष त्यांची कार्यकारणी यांनी ठीक सकाळी १० वाजता सातारा शहरात  शाहू चौक येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here