सातारा : संत रोहिदास यांची जयंती विविध संघटनांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष बी.एल. माने होते.
प्रथमतः डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास व संत रोहिदास यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पाडला.यावेळी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,बी.एल.माने आदींनी संत रोहिदास यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी पहाडी आवाजात गीते सादर केली.
रिपब्लिकन सेनेचे गणेश कारंडे यांनी स्वागत केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रोत्सवचे ऍड.विलास वहागावकर यांनी आभारप्रदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ, रिपब्लिकन सेना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद बनसोडे,ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनावणे व पी.टी. कांबळे,ओबीसे नेते वैभव गवळी,पतसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले,पत्रकार अरुण जावळे, विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.