कबिराच्या दोह्याप्रमाणे मानवाने समाजाचा सर्वांगीण विकास करावा.

0

सातारा : कबीर कहे, “कुछ उद्दम कीजे। आप खाये। और औरोंको दिजीए। या कबिराच्या दोह्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने  स्वतः काम/उद्योग केला पाहिजे. स्वतः बरोबरच समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.

              संत कबीर यांची जयंती व ज्येष्ट पौर्णिमा येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ साजरी साजरी करण्यात आली.तेव्हा अनिल वीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी एस.डी.भोसले होते.वीर म्हणाले, “म.कबीर,म. फुले व म.बुद्ध असे बाबासाहेबांचे तीन गुरू होते. संपूर्ण विश्वाला शांतिचा संदेश देणारे महामैत्रीवान तथागत सम्यक संबुद्ध यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना :  सुजातास तथागतांनी धम्म दीक्षा दिली. तपूस्स व भल्लीक यांची धम्म दीक्षा पार पडली होती.याच पौर्णिमेच्या दिवशी  सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी श्रीलंकेत पोहोचला होता.भिक्खू महेंद्राचे निर्वाणही याच पौर्णिमेला झाले होते.अशा महत्त्वपुर्ण ऐतिहासिक पवित्र घटनांचा पवित्र दिन म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा होय.” अशापद्धतीने विविध उदाहरणाद्वारे त्यांनी माहिती कथन केली.वीर म्हणाले, “कोणताच मनुष्य परिपूर्ण नसतो. विज्ञानाधारीत सत्य माहिती पुढे आली पाहिजे.खोटा इतिहास न सांगता खरा-खुरा असणारा इतिहास,लेख,माहिती आदींचे अवलोकन करून लेखक,वक्ता, पत्रकार आदींनी समाजापुढे   आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्ञान दिल्याने अधिकच वाढत राहते.तेव्हा संकुचितपणा स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरतो.”

    प्रारंभी,जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्मबांधव उत्सव कमिटीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर,बौद्धाचार्य जनार्धन कांबळे,रमेश इंजे,कुमार सुर्वे आदींनी मनोगत व्यक्त केली. किशोर गायकवाड यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,ऍड.दयानंद माने, ऍड. विलास वहागावकर, सुदर्शन इंगळे,शाहिर श्रीरंग रणदिवे, युवा शाहिर सत्यवान गायकवाड,अंकुश धाइंजे,मनोज वाघमारे, बी.एल.माने,माजी केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड, तुकाराम गायकवाड,सुखदेव घोडके,मंगेश डावरे,कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here