ज्ञानज्योतीच्या पूजनाने पार्लर अँड शॉपिंगचे उदघाटन

0

सातारा : ज्योत से ज्योत जगाओ….या प्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी  अभिवादन केले.तदनंतर मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.अशा पद्धतीने लाजरी ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपिंग सेंटरचे औपचारिक उदघाटन करण्यात आले.

        सदरच्या कार्यक्रमास बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ, सीताराम चाळके व गजानन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

             प्रो.प्रा.सौ.हर्षाली प्रशांत पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अभिष्टचिंतन सोहळाही रंगतदार संपन्न झाला.प्रथमतः वीरसर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.ते उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले, “ना नफा ना तोटा …या तत्वावर उत्तरोत्तर प्रगती होत असते.पोतदार दाम्पत्यानी उभारलेल्या व्यवसायास नक्कीच यश मिळेल.कारण,अनुभव व मित्रपरिवार यांचा फौजफाटा मोठा आहे.शिवाय, विकासनगरच्या विकास वाटेवरील चांगले असे ठिकाण आहे.” अशाच पद्धतीने अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतनासह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ.श्री. व सौ प्रशांत देशपांडे, प्रसिद्ध उद्योजक श्री. व सौ.किरण पाटील खेड ग्रामपंचयत माजी सरपंच सौ. बोराटे, प्रकाश खटावकर, श्रीनिवास जांभळे,दिलीप महादार, पाटीलमॅडम,सविता माने, अर्चना भोसले,उज्वला सुतार, प्रेरणा बचत गट सर्व महिलासह सुमारे २०० व विविध क्षेत्रातील सुमारे २५० मान्यवर मंडळी उपस्थित होते. गुलाबपुष्प व पेढा देवुन उपस्थित मान्यवरांचे वीर व मानस प्रशात पोतदार यांनी स्वागत केले.प्रशांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. सौ.हर्षाली पोतदार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here