डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत भूखंड मिळावा.

0
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात सहभागी झालेले मान्यवर.

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागासवर्गीय विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत औद्योगिक भूखंड मिळावा.म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात आले.

                     सदरच्या योजनेची अंमलबजावणी ही १९६४ सालापासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रचलित आहे. तथापि,या योजनेचा मागासवर्गीय उद्योकांना औद्योगिक क्षेत्रातील भूखंड लाभ मिळत नाही.तेव्हा संबंधित सातारा औद्योगिक विकास महामंडळाकडे उपलब्ध असलेले प्लॉट मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी न देता त्याचा गैरवापर करत आहेत.परस्पर एकाहून अधिक व्यक्तींना गैरमार्गाने प्रथम भूखंड याचा लाभ दिलेला असतानाही वारंवार त्याच व्यक्तीस पुनर्लाभ मिळत आलेला आहे. मागासवर्गीय उद्योजकांनी  उद्योगासाठी मोकळा असलेला ओएस-९ या भूखंडाची मागणी केली आहे. मात्र,संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून त्या ठिकाणी अवैद्य कामे चालू आहेत.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसाट,प. सरचिटणीस राजरत्न कांबळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव लांदे, उपजिल्हाध्यक्ष सतीश वाघमारे, सचिव गुलाब बनसोडे, कार्याध्यक्ष अरुण पवार, तालुकाध्यक्ष सयाजी कांबळे (सातारा) व यशवंत बरकडे (खंडाळा),आनंद कांबळे, श्रीकांत कांबळे तसेच उपोषणकर्ते शेखर कांबळे यांच्यासह राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,अनिल वीर व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here