तंबाखू गुटखा नको रे बाबा…. वैद्यकीय महाविद्यालयाने दिला संदेश.

0

सातारा/अनिल वीर : तंबाखू गुटखा नकोरे बाबा…असा संदेश देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्ययनार्थीनी दिला.त्यांनी एसटी स्टॅन्ड परिसर दुमदुमून सोडला.

             जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने येथील शासकीय महाविद्यालय व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात व्यसनाच्या दुष्परिणामांचे पोस्टर प्रदर्शन भरवले होते.तेव्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रवाशांना गुटखा तंबाखूजन्य पदार्थ यासारख्या व्यसनात अडकल्यानंतर काय अवस्था होते ? हे दाखवून दिले. मित्रांमध्ये दबाव तंत्र वापरून आपण व्यसनाला बळी पडतो. आपल्या शरीराची व आपल्या कुटुंबाचीही हानी होते. असा संदेश लोकांमध्ये पोहोचला व तरुणांनी व्यसनाला बळी पडू नका/ वेळीच मदत मागून व्यसनातून बाहेर पडा. असे आवाहन केले. अशा पद्धतीची जनजागृती व्हावी असे मत बस स्थानक प्रमुख मोरे यांनी केले.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता रवींद्र चव्हाण. प्रितेश राऊत आदी उपस्थित होते. प्रवाशांनीही  पथनाट्य पाहून मुलांचे कौतुक केले. परिवर्तन संस्थेचे उदय चव्हाण यांनी सांगितले की,पोस्टर लावत असताना तिथल्या महिला कर्मचारी शालन सवाई या स्वतःहून पोस्टर लावण्यास मदत करण्यास आल्या तसेच चार ते पाच ड्रायव्हर कंडक्टर लोकांनी आम्हालाही असे पोस्टर गावामध्ये लावण्यास मिळावीत अशी विनंती केली .म्हणजेच या जनजागृतीचे एक पा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here