फुले -आंबेडकर संयुक्त जयंती रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार!

0

सातारा: महात्मा जोतिबा फुले यांची दि.११ रोजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि.१४ रोजी होत आहे.तेव्हा रिपब्लिकन पक्षांच्यावतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.

        राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे जन्मगाव हे जिल्ह्यातील कटगुण,  ता. खटाव आहे.तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दि.११ रोजी जिल्हा कार्यालयापासून ते राजपूत व राजपथापासून ते शाहू चौक अशी भव्य -दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी शेकडो भीमसैनिक सामील होणार आहेत. महामानवांचा विचाराचा जागर करण्यात येणार आहे.त्याच अनुषंगाने संध्याकाळी अजंठा चौक येथील कार्यालयात प्रबोधनपर कार्यक्रम व भोजनदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१३ रोजी संध्याकाळी प्रतापसिंह नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाहू चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.रात्री बारा वाजता भव्य अशी फटाक्याची अतिशबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.१४ रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशीलाचा कार्यक्रम प्रतापसिंहनगर येथे सकाळी होणार आहे.तेव्हा मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  घालून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरची मिरवणूक प्रतापसिंह नगर पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहचणार आहे. त्यामध्ये ढोल ताशाच्या गजरासह कार्यक्रमाचे नियोजन-संयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर १३२ किलोचा केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात येणार आहे.

तेव्हा आंबेडकर अनुयायिनी उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ धोत्रे,जिल्हा सचिव किरण बगाडे,जिल्हा संघटक सागर फाळके, कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, कराड तालुकाध्यक्ष मुकुंद माने  महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमित मोरे, तालुकाध्यक्ष सागर भिलारे,सातारा तालुकाध्यक्ष रामभाऊ,युवक अध्यक्ष अतुल कांबळे,तालुका कार्याध्यक्ष योगेश माने,शहराध्यक्ष राजेंद्र होटकर, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ओव्हाळ, तालुकाध्यक्ष जाधव, युवक सरचिटणीस राज चव्हाण, जिल्हा सचिव रंजना जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष स्मिता जगताप, काजल सानप, दिपाली शिंदे, उत्तरेश्वर ओव्हाळ आदीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here