राष्ट्रीय विज्ञान दिनी अंनिसचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0
फोटो : अंनिसच्या प्रयोगासाठीचे साहित्यासह समोर अध्ययनार्थी.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : राष्ट्रीय  विज्ञान दिनानिमित्त लाहोटी कन्या विद्यालय,कराड येथे व जागृती आश्रम शाळा, उंब्रज येथे  समाज कल्याण आयुक्त नितीन उबाळे यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक बाबर यांच्या मदतीने डॉ.एन. डी.पाटील वैज्ञानिक जाणीवा अभियानांतर्गत अंधश्रध्दा विनाशाय हे मनोरंजनातून प्रात्यक्षिके कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसतर्फे घेण्यात आली. 

           कराड येथील कार्यक्रमास बाळ देवधर,जोशी व बोत्रे पूर्णवेळ उपस्थित होते. दोन्हीही कार्यक्रमात प्रशांत पोतदार व भगवान रणदिवे यांनी सक्रिय सहभाग घेतला. लाहोटी विद्यालयात सुमारे ३०० अध्ययनार्थी व आश्रमशाळेत ७० अध्ययनार्थीनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here