अगस्ती इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थांची नामांकित कंपन्यामध्ये नियुक्ती

0

अकोले (वार्ताहर) :- 

 अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थेतील अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अँप्लिकेशन अँड रिसर्च मधील विद्यार्थ्यांची नुकतीच राज्यातील नामांकित कंपन्यामध्ये नियुक्ती झाली आहे. परिसंस्थेतील कु.राहुल सोपान कराळे यांस शाखा व्यवस्थापकतर कु.घनश्याम बाळासाहेब वैद्य या विद्यार्थ्याला अॅरिस कॅपीटल प्रा.लिमिटेड या कंपनीत एक्झीक्युटिव्ह पदी सेवा करण्याची नव्याने संधी प्राप्त झाली आहे. तसेच कु.आशिष अशोक देशमुख याची एक्सलआर, कु. मयूर भारत गोपाळे याची शाडो इन्फोटेक, कु. वैष्णवी आबासाहेब वीर हिची इक्लेरक्स, कु. श्रेया सुधाकर शिरसाठ हिची श्रीराम लाइफ इन्शुरन्स, कु. नेहा नाईकवाडी हिची श्रीनिवास हायटेक लिमिटेड, कु.अनुजा चंद्रकांत मालुंजकर हिची एच.डी.एफ.सी. बँक, कु.उत्कर्ष कैलास ताजणे याची डेटामॅट्रिक, कु.शुभम वसंत गजे याची डेटामॅट्रिक,कु.अभिजीत तुकाराम शेटे याची साई अर्पण ट्रॅक्टर प्रा. लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये मागील वर्षी निवड झाली आहे.त्यापूर्वी कु. अंकिता चिंतामण सानप हिची सक्सेस प्लेसमेंट सर्विसेस, कु. ज्ञानेश्वरी अनिल वंडेकर हिची टीसीएस,कु.कृष्णा लक्ष्मण तांबे व कु.प्रतिक सोनवने यांना इगलबाईट सोल्यूशन प्रायोजित लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये नियुक्ती मिळालेली आहे.

अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अँप्लिकेशन अँड रिसर्च परिसंस्था एकविसाव्या शतकातील वाढत्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शाश्वत रोजगाराची ग्वाही देते. व्यावसायिक जगाच्या आव्हानांचा सामना करत विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कला कौशल्यांचा महाराष्ट्रातील अनेक नामांकित कंपन्यांना लाभ होत आहे. एकूणच या सर्व प्लेसमेंटमुळे अकोले पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गरीब व होतकरू असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी जीवनासह त्यांच्या पंखांना आत्मबळ प्राप्त होण्यास मदत होत आहे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड, संस्थेचे कायम विश्वस्त वैभवराव पिचड, संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, संस्थेचे सचिव सुधाकर देशमुख, परिसंस्थेचे संचालक डॉ. प्रशांत तांबे आदी मान्यवर यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना विविध प्लेसमेंट उपलब्ध करून देण्यासाठी अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अँप्लिकेशन अँड रिसर्च प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रशांत उगले, एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा.गोपाळ बूब, एम.सी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. अमोल नवले, प्रा.महेश पावडे, प्रा.सुयोग गजे, प्रा.अमर खोंड, प्रा.संकेत ढवळे, प्रा. जय पथवे, प्रा.प्रशांत बोऱ्हाडे, प्राध्यापिका ऋतुजा भांगरे यांच्यासह सर्वच प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here