कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स ,गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे “महिलांच्या
सशक्तीकरणासाठी योग” या संकल्पनेवर आधारित या वर्षाचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाभ्यासाचा नियमित
अंगीकार केल्यामुळे जीवनात शारीरिक मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे योगाचे महत्त्व व योगाभ्यास जनजागृतीसाठी
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक योग दिन साजरा केला जातो.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला भोर यांनी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या .योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे यावरही त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात कु. भावना नलगे व कु. ईश्वरी नलगे यांनी योग
प्रात्यक्षिक करून दाखवले व कृतिशील असे प्रशिक्षण दिले.
हा कार्यक्रम जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व एन. सी. सी. या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. योग अभ्यासाचे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. बंडेराव तऱ्हाळ, क्रीडा संचालक प्रा. डॉ. विशाल पवार, एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चौधरी, प्रा. शोभा दिघे, ज्युनिअर विभागाचे क्रीडा संचालक प्रा.एस. आर. कदम यांनी या योग शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिरात कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब वर्पे , वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत हे या शिबिरात आवर्जून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या शिबिरात सहभाग घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी प्रशिक्षक व सर्व प्रशिक्षणार्थीचे आभार मानले.