केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी जायकवाडी येथील पाइपलाइनचे सुरू असलेल्या कामाची केली पाहणी.

0

पैठण,दिं.२५(प्रतिनिधी)  :  जायकवाडी धरणातून अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे . आज रोजी छत्रपती संभाजीनगर शहराला सात ते आठ दिवसाला पाणीपुरवठा होत असल्यामुळे लवकरात लवकर नवीन पाईपलाईनचे काम मार्गी लावण्यासाठी गुरूवार (ता.२५) रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ . भागवत कराड यांनी शहरातल्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना मंत्री भागवत कराड यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व पाइपलाइनचे काम करत असलेल्या कंत्राटदार यांना दिल्या .

   जायकवाडी पंप हाऊस परिसराला गुरुवार रोजी बारा वाजता भेट दिली .पुढे बोलताना ते म्हणाले की,हर घर – नल  हा  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नारा आहे .आज रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गंगापूर , वैजापूर , सिल्लोड  ,पैठण या ठिकाणी वॉटर ग्रीड योजनांचे काम सुरू आहे .  भविष्यात छत्रपती संभाजीनगरच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ३२ लाख लोकसंख्ये ला पाणी पुरेल अशी व्यवस्था या योजनेच्या माध्यमातून आज रोजी सुरू आहे . या प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहे .

     यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड यांचे स्वागत पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे सह आदींनी केले यावेळी माजी स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मधुकर पाटील, कार्यकारी अभियंता राम लोलापूर, दिपक कोळी जेव्हिपी आर कंपनीचे प्रकाश आवधुते, संजीव शर्मा ,भाजपा शहराध्यक्ष शेखर पाटील, विशाल पोहेकर, तहसीलदार महेश लाड,तलाठी सोनवणे ,महेश जोशी, भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई कुलकर्णी,भाजपा महिला शहराध्यक्ष नम्रता पटेल, माजी नगरसेवक बंडू आंधळे,  प्रशांत आव्हाड, संकेत सुर्यनारायण, शिवनाथ सोनवणे, गणेश नाटकर,  कल्याण खरात, सतिश दहिहंडे, निलेश केवट, संजय गुंडेकर उपस्थित होते यावेळी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, बीट अंमलदार राहुल महोतमल ,पोलीस कर्मचारी तात्यासाहेब गोपाळघरे आदीनी बंदोबस्त ठेवला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here