के .जे. सोमैया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

0


कोपरगांव: स्थानिक के .जे. सोमैया ( वरिष्ठ ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन योग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव यांनी दिली. ५७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एन.सी.सी., एन.एस.एस., क्रिडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबिरात प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे यांनी योग, प्राणायाम व व्यायामाचे विविध प्रात्यक्षिके विद्यार्थांसमोर केली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी योगाचे महत्त्व नमूद करतांना सांगितले कि ‘मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासनांचे मोलाचे स्थान आहे.’
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, शा. शि. संचालक डॉ.सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे, एन.सी.सी. प्रमुख डॉ. एन.जी.शिंदे, लेफ्टनंट प्रा. वर्षा आहेर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here