के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळीची १०० %  निकालाची परंपरा कायम.

0
8

कोपरगाव: पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल 2023 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच Online जाहीर झाला असून चासनळी येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून. विज्ञान शाखेतून कुमारी गायत्री भाऊसाहेब शिंदे (७२.६७%) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तसेच गायत्री राधाकिसन पारखे (७१%) ही विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली व रितेश प्रकाश चांदगुडे (६८.१७) हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
वाणिज्य विभागातून निखिल राजेंद्र सानप (८३%) हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून अंजली सुनील गाढे (८२.८३%) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली व राधिका संतोष घुगे (८२.३३%) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे सचिव संजीव कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, सुजीत रोहमारे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, पंडितराव चांदगुडे, संजय चांदगुडे, सचिन चांदगुडे, मनेष गाडे, रामभाऊ गाढे, डॉ. विकास जामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य एन. जी. बारे आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here