वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सहकार चळवळीत अग्रेसर असलेल्या चांदेकसारे विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. साई लक्ष्मी मंगल कार्यालया मध्ये सभासदांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन यांनी चालू वर्षी सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी सोसायटीच्या वतीने 12% लाभांश देणार असल्याचे जाहीर केले .
संस्थेचा पारदर्शक कारभार असल्याने संस्थेच्या वतीने चालू वर्षी देखील सभासदांचा अपघाती एक लाख रुपयांचा विमा मोफत उतरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या ४४ सभासदांनी संस्थेचे कर्ज घेऊन ही त्याची परतफेड मुदतीत केल्यामुळे त्यांना शासनाचा तीन टक्के व्याजाचा परतावा मिळाला. संस्था ही सभासदांची जननी असून सभासदांनी संस्थेचे कर्ज घेतले पाहिजे व त्याची मुदतीत परतफेड केली पाहिजे असं केल्याने शासनाच्या विविध योजनेचा सभासदांना लाभ घेता येतो असेही सुभाष होन यांनी सांगितले.
विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव विजय खरात यांनी केले. संस्थेचे माजी अध्यक्ष सुभेदार शांतीलाल होन यांची सैनिक शिवसेना आघाडीच्या सचिव पदी निवड झाल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ होन, संचालक शांतीलाल होन, मोहन होन , जयद्रथ होन, मनोहर होन ,सजन होन, दत्तात्रय होन, देविदास होऊशन, अनुताई होन, रंजना होन,प्रा. विठ्ठल होन, बाजीराव वक्ते, साहेबराव होन, कल्याण होन, अर्जुन होन, धर्मा होन, धर्मा गुरसळ, ज्ञानदेव होन, रमेश होन, रामदास होन, कांतीलाल होन, कर्नासाहेब होन
अदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विजय खरात यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक जयद्रथ होन यांनी मानले.