चौकशीला न करताच अधिकारी परतले;चौकशी अधिकारीच सापडले संशयाच्या भोवऱ्यात .

0
46

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

          तालुक्यातील राहुरी एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेचा प्रात्यक्षिक ( प्रॅक्टिकल) परिक्षेदरम्यान तत्कालीन प्राचार्याच्या मुलीसाठी कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन  व विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर चौकशीसाठी आले असता त्यांनी केलेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या अधिकाऱ्यांनी चौकशी न करता शाळेच्या वतीने त्यांचा शॉल बुके देऊन सन्मान केल्याने या आधिकाऱ्यांनी चौकशी न करता घडलेल्या प्रकारावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केल्याने प्रॅक्टिकल पेपर फोडून विद्यार्थीनीस लिहुण देणाऱ्या शिक्षकांच्या आधी चौकशी अधिकाऱ्यांची आधी चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी केली आहे.

                    राहुरी तालुक्यातील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विद्यालयात प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा पार पडत असताना या विद्यालयातील तत्कालीन प्राचार्य यांनी उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना हाताशी धरुन स्वतःच्या मुलीसाठी प्राचार्यांच्या कस्टडीत असलेला प्रॅक्टिकल पेपर फोडला याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांजवळ दिल्या नंतर काही संघटनांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या नंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन  व विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर यांना चौकशी करण्यास सांगितले होते.परंतू या शाळेतील शिक्षकांनी असा प्रकार घडलाच नाही.असे सांगुन चौकशीसाठी आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी शिक्षकांवर विश्वास ठेवून चौकशी न करता माघारी परतले.

           तत्कालीन प्राचार्याची मुलगी उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत असुन मर्जीतील प्राचार्याची मुलगी चांगल्या मार्काने पास व्हावी यासाठी याच विद्यालयातील विज्ञान शाखेच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थींनीचा प्रात्यक्षिकचा  (प्रॅक्टिकल) पेपर स्वतः लिहुण दिला आहे.समोर आले असताना चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन  व विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर यांनी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे वृत्तपञ प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले होते. परंतू ऐनवेळी चौकशी अधिकाऱ्यांनी घुमजाव करीत असा कोणताही प्रकार घडलाच नाही असे सांगुन घडलेल्या प्रकरणावर पांघरुन घातले आहे.उलट तत्कालीन प्राचार्य व विद्यमान प्राचार्यसह त्या दोन शिक्षकांना पाठीशी घातले आहे. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच चौकशी न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन शिक्षण विभागा समोर केले जाईल असा इशारा हि संतोष चोळके यांनी दिला आहे.

…..त्या शालेने काँपी प्रकरणावर पडदा

             राहुरी तालुक्यात एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तत्कालीन प्राचार्याच्या मुलीसाठी विज्ञान शाखेचा प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) पेपर फोडून स्वतः शिक्षकांनी लिहला असल्याची तक्रार संघटनांनी केल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करुन मायेची शाल पांघरुन घातल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता संबधित शिक्षक व तत्कालीन प्राचार्य व विद्यमान प्राचार्य यांना पाठीशी घातले आहे.अखेर शाळेच्या शालने काँपी प्रकरणावर पडदा टाकला आहे.

आपले हात वर पर्यंत, कारवाई होणारच नाही.

              तत्कालीन प्राचार्य याने माञ शाळेबाहेर फुशारकी मारण्यास सुरवात केली आहे. माझे हात शिक्षणक्षेञात वर पर्यंत पोहचलेले आहे.माझ्या मुलीला मदत करणाऱ्या शिक्षकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.अशा कितीही चौकशी आल्या तरी त्या कशा परतावून लावायच्या याची खोल पर्यंत माहिती आपल्याकडे असल्याने कोणीही चौकशी केली तरी माझ्यासह त्या शिक्षकांचे काहीच होवू शकत नाही. असे तत्कालीन प्राचार्य याच विद्यालया बाहेर उभा राहुन पालकांशी बोलताना सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here