जामखेड येथील नागपंचमी यात्रा उत्सवानिमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

जामखेड शहरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी होणाऱ्या नागपंचमी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद मेळाव्यात येणारे पाळणे, मनोरंजनाचे खेळ यांचा लिलाव, दर निश्चिती व तेथे देण्यात येणाऱ्या सुरक्षा व स्वच्छता यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे. शहरातील ट्राफिक, पार्किंग, स्वच्छता, लाईट, पालखी मार्ग, अखंड हरिनाम सप्ताह व कुस्त्यांचा हगामा यासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत उपाययोजना कराव्यात परंतु जामखेड शहराच्या नियमित समस्यांबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा याबाबत उपस्थिती करण्यात आलेल्या मागण्यांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे अश्वासन उपस्थित शासकीय अधिकारी यांनी दिल्याने ही शांतता कमिटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपत्र झाली.

           

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले ,पोलीस निरीक्षक महेश पाटील, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, महावितरणचे केदार, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, उद्योजग रमेश अजबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिष पारवे ,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,मनसेचे हवा सरनोबत, बाजार समितीचे संचालक सुरेश पवार,मनसे उपाध्यक्ष सनी सदाफुले, मंगेश आजबे,नगरसेवक मोहन पवार, डिंगाबर चव्हाण, अमित जाधव,शामेर सय्यद, कुंडल राळेभात,विनायक राऊत, राजेश मोरे,प्राचार्य विकी घायतडक, विकास मासाळ,पांडुरंग भोसले,सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,प्रविण उगले, उमर कुरेशी, अशोक यादव,संपत राळेभात,बापूसाहेब गायकवाड,प्रशांत राळेभात,अभिजीत राळेभात, संतोष गव्हाळे,माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, विनय डुकरे,अजिनाथ शिंदे,विशाल अब्दुले,वसिम सय्यद,बाबासाहेब फुलमाळी , ऋषिकेश राऊत, अनिल पाटील, आनंद राजगुरू आदि मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत प्रा. मधुकर राळेभात,  अजय काशिद, प्रदीप टापरे,मोहन पवार, पवन राळेभात, मंगेश आजबे,  आदींनी नागपंचमी यात्रेत करावयाच्या उपाययोजना व अडचणींबाबत आपली मते व्यक्त केली. 

यावेळी नागेश्वर यात्रेच्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या  बैठकीत  खालील मुद्दयांवरती चर्चा करण्यात आली. शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजविणे व मुरुम टाकणे, शहरातील रस्त्यावरील लाईट दुरुस्त करणे, ट्राफिक समस्या व पार्किंग बाबत योग्य त्या उपाययोजना करणे. आनंद मेळवा निलाव तसेच तिकीट दर मर्यादित ठेवणे. मेळाव्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच वाँचर टॉवर, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, पालखी मार्गावरील खड्डे बुजवून आवश्यक त्या ठिकाणी लाईट बसवण्याची व्यवस्था करणे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे. रस्त्यावर सीसीटीव्ही बसवणे, सांस्कृतिक डावाच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमणे, पोलीस मदत केंद्र व ट्राफिक समस्या योग्य उपाययोजना करणे. असे अनेक मुद्दे शांतता कमिटी सदस्यांकडून मांडण्यात आले. यावर ज्या त्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच नागेश्वर यात्रा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहतील असे अश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here