पोहेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी तोडले

0
6

रकमेसह एटीएम मशिन नेले चोरून

कोपरगाव (वार्ताहर)कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून मशीन मधील सर्व रक्कम चोरून नेली. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एटीएम मशीन देखील आपल्याबरोबर नेले आहे. यामुळे पोहेगांव परिसरात घबराट निर्माण झाली असून व्यापारी संकुलात आघाडीवर असलेल्या गावचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

शनिवारी पहाटे 3 वाजता अज्ञात चोरटे यांनी परिसरातील वातावरणाचा आढावा घेत इंडियन ओव्हरसीजच्या एटीएम मशिन रूममध्ये प्रवेश केला.लोखंडी टॉमी व इतर इलेक्ट्रिक साहित्याच्या आधारे त्यांनी आजुबाजुचे सर्व अँगल व मशीन ची तोडफोड केली . साधारण चार ते पाच हे चोरटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे कशा पद्धतीने चोरी करत आहे याचे सर्व चित्रीकरण झाले आहे. एटीएम फुटल्याची माहिती पोलीस पाटील जयंतराव रोहमारे यांनी शिर्डी पोलिसांना देतात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस नाईक अविनाश मकासरे,पोलीस कॉन्स्टेबल दळवी,पोलीस कॉन्स्टेबल बाबा आहेर,श्री वर्पे घटनास्थळी दाखल झाली. बँकेचे मॅनेजर बी डी कोरडे,राम गौर यांना याबाबत त्यांनी माहिती विचारली असता. शुक्रवारी संध्याकाळी बँकेची सुट्टी झाल्यावर बँकेत 1 लाख 32 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने बँकेचे सीसीटीव्ही फुटेज शेजारील गौतम सहकारी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. चोरट्यांनी सदर एटीएम मशीन खोलून नेण्यासाठी   पिक अप गाडीचा  वापर केला होता. चोरट्यानी मशीन खोलल्यानंतर अतिशय वजनदार मशीन गाडीत टाकता न आल्याने त्यांनी वायर रोप लावत गाडीच्या मागच्या बाजूला ते बांधून पोहेगांव पाथरे रोडने शिंदे वस्ती लगत गोदावरी उजव्या कॅनॉलच्या कडेला निर्जन ठिकाणी नेले असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते कैलास औताडे यांना आला त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक श्री दुधाळ यांना दिली असता सर्वांना बरोबर घेत ते ठिकाण गाठले. मशीन हेवी असल्याने चोरट्यांना ते फोडता आले नाही. सदर मशीन त्यांनी कँनालच्या कडेला काट्या टाकून लपून ठेवले. लपलेले मशीन पोलिसांच्या हाती लागले . त्यांनी जेसीबीच्या साह्याने हे मशीन शिर्डी पोलीस स्टेशनला पाठवले आहे. दोन तास चोरीचे प्रयत्न करून चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याची चर्चा दिवसभर गावात पसरली. पोहेगांव एटीएम चोरीची ही तिसरी घटना असू परिसरात व्यापारी वर्गाचे मोठे जाळे झाले आहे. अशा घटना घडल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी पोलीस स्टेशन ने याबाबत निर्णय घेऊन एक तर पोलीस दूरक्षेत्र चालू करावे अन्यथा रात्रीची गस्त सुरू ठेवावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

चौकट… पोहेगांव परिसरात अवैध धंदे,चोऱ्यामाऱ्या, एटीएम फोडण्यासारख्या घटना वारंवार घडत आहे. याकडे शिर्डी पोलीस स्टेशनचे पुरते दुर्लक्ष असून पोहेगांव पोलीस दुरुक्षेत्र गेली चार वर्षापासून कायमच बंद असल्याने या घटना वाढत चालल्या आहे. वारंवार निवेदन, उपोषण ,आंदोलन करून देखील शिर्डी पोलीस स्टेशन याकडे लक्ष देत नाही. ही बाब अतिशय चुकीची आहे. नागरिकांच्या मनामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन बद्दल असंतोष असून अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी पूर्ण ताकतीने यात लक्ष घालावे पोलीस दुरुक्षेत्र सुरू करावे…

नितिनराव औताडे.. शिवसेना नेते पोहेगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here