प्रगत विद्यालयाची निकालाची परंपरा कायम

0
7

विज्ञान विभागाचा 99.20 तर वाणिज्य विभागाचा 85.50 टक्के निकाल

नगर – गांधी मैदान, नवीपेठ येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.12 वी  विज्ञान शाखेचा 99.20% निकाल लागला असून एकूण 125 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तेरा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर प्रथम श्रेणीमध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

     विज्ञान शाखेमध्ये विद्यालयामध्ये चि.जांभळे श्रीराम विक्रम याने  88.67% गुण मिळवून विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर चि.बोडखे अथर्व जगन्नाथ याने  86.30 % गुण मिळून द्वितीय तसेच कु .पवार स्नेहा तुलसीराम 85.50% गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला.         

     वाणिज्य विभागाचा निकाल 83.87% लागला असून एकूण 31 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकूण 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य विभागात विद्यालयामध्ये कु.गरड उत्कर्षा विजय हिने 79 .67 टक्के  गुण मिळवत प्रथम, कु. ढोणे नारायणी ज्ञानेश्वर हिने 72.50 टक्के गुणत द्वितीय  तर कु.लोंढे मयुरी भागवत 65.67 % गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला

     यासर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व विद्यालयाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष दि. ना. जोशी, उपाध्यक्षा श्रीमती विजया रेखे, सेक्रेटरी अनिरुद्ध देवचक्के, सहसेक्रेटरी सुनील रुणवाल, प्रगत विद्यालयाचे चेअरमन व खजिनदार उमेशजी रेखे, कार्यकारिणी सदस्य प्रशांत भालेराव, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा धरम,  प्रा. हर्षाली देशमुख तसेच सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने सर्व यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे  हार्दिक अभिनंदन  करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here