कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर कोळपेवाडी येथील ऊसतोड मजूर चिंतामण लाला सोनवणे याची कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती आरोपीच्या बचाव पक्षाचे वकील अॅड् दीपक पोळ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहाजापूर – कोळपेवाडी येथील जुने गावठाण भागातील फिर्यादीच्या घरात घुसून आरोपीने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंडविधान संहिता कलम ३७६ अन्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरूध्द फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतचे दोषारोप पत्र न्यायालयात पोलिसांनी दाखल करण्यात आल्यानंतर या खटल्यात फिर्यादी तर्फे ७ साक्षीदरांनी तपासले. अॅड. पोळ यांनी तपासातील व पुराव्यातील विसंगती, उलट तपासातील उणीवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या . कागदोपत्री व तोंडी पुरावा व उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून तर्फे अॅड्. ए. एल. वहाडणे यांनी काम पाहिले. तर आरोपी बचाव पक्षाकडून अॅड. दिपक दादाहरी पोळ यांनी जामीनापासून ते अखेरपर्यन्त प्रकरणाचे काम पाहिले.