वनविभागाकडून परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन
सोनेवाडी ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून काल जायपत्रे वस्ती परिसरात त्याने हल्ला करत जायपत्रे यांच्या शेळी ठार केली.रात्री केलेल्या या बिबट्याच्या आल्याने जायपत्रे वस्तीवरील संजय चापाजी जायपत्रे व त्यांचे कुटुंब भयभीत झाले.
हल्ला झाल्याची बातमी पोलीस पाटील दगू गुडघे यांना कळवल्यानंतर गुडघे यांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाचे अधिकारी जायपत्रे वस्ती परिसरात घटनास्थळी दाखल होत शेळी ठार केली असल्याचा पंचनामा केला. परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.मात्र नागरिकांनी यावर समाधान न मानता वन विभागाला वारंवार या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असताना देखील वन विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे