मतदान प्रक्रिया नियमानुसार राबवावी – माणिक आहेर

0

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ६०० अधिकारी – कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

शिर्डी, दि.१२ – मतदानाच्या दिवशी गडबड, गोंधळ होऊ न देता सुटसुटीतपणे आणि नियमानुसार मतदान प्रक्रिया राबवावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिल्या.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ६०० मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या द्वितीय प्रशिक्षण  सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे आदी उपस्थित होते. 

आहेर यांनी मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  मतदान कक्षात गर्दी होवू न देता  एकाचवेळी चार-पाच जणांना प्रवेश देण्यास यावा, अशा सूचनाही आहेर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांचे निवेदन व्हिडीओ चित्रफीतीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. शारदा विद्यालयात प्रत्यक्ष मतदान यंत्रांची हाताळणीचे यांत्रिक प्रशिक्षण घेण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here