ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी : विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात रोबोटिक उत्क्रांती होते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञान युगात सर्व घटकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालय, कोपरगांव,द बाॅम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी, राजगुरुनगर, सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे वतीने उच्च माध्यमिक शिक्षण घेणा-या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचेसाठी ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कोपरगांव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालयात करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांचे शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सूर्यतेजचे सुशांत घोडके, सुभेदार मारुतीराव कोपरे, सेवा निवृत्त नायब तहसीलदार खिंवराज दुशिंग, उपप्राचार्य संजय शिंदे, प्रा. मोहन सांगळे, प्रशिक्षक प्रा. सागर खोडदे, प्रा. पिनाक रुबारी ,कार्यशाळा अधिकारी एकनाथ कळमकर आदींसह महाविद्यालय शिक्षक, शिक्षिका आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.या प्रसंगी पोलीस निरीक्षक कोळी पुढे म्हणाले, ए. आय. च्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होणार आहे. सायबर युगात अवगत तंत्रज्ञानाचा सदुपयोग करा. दुरुपयोग झाला तर कडक शासन होणार असल्याचे आवर्जून सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले,ए.आय.तंत्रज्ञान हे चारशे वर्षापेक्षा जास्त जुने आहे. काळानुरुप तंत्रज्ञानाचा सहाय्याने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थांना प्रशिक्षणाच्या मिळालेल्या संधीचे सोनं करतील. असे आवर्जून सांगितले. प्रारंभी मराठी विभागाचे वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्ताने तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य संजय शिंदे यांनी कार्यशाळेची रुपरेषा प्रा. सागर खोडदे यांनी विषद केली. तर आभार कार्यशाळा अधिकारी प्रा. एकनाथ कळमकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिता अत्रे यांनी केले. या कार्यशाळेत सुमारे १५० विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले आहे.