विद्यार्थ्यांना मिळालेली रोख बक्षिसे मधुन शालेय साहित्य खरेदी करुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0

                देवळाली प्रवरा /प्रतिनिधी   देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळा (सेमी इंग्रजी)शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिस रुपाने मिळालेली रोख बक्षिसे मधुन शालेय साहित्य खरेदी करुन बक्षिस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

           स्वातंत्र्य दिन व इतर कार्यक्रमातून पालक व नागरीकांकडून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी रोख स्वरुपात बक्षिसे दिली जातात.बक्षिस रुपाने मिळालेली रक्कमेचा चांगला विनियोग व्हावा या येथुने येथिल शिक्षका सुप्रिया आंबेकर, मिनाषी तुपे,स्वाती पालवे यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या खरेदी करुन ज्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षिसे मिळाली त्या विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.

                  यावेळी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे,सदस्य अमोल भांगरे, माजी अध्यक्ष सुनिल शेटे, मुख्याध्यापिका मंगल पठारे,स्वाती पालवे, सुप्रिया आंबेकर, ऐ.व्ही.तुपे, सुनिता मुरकुटे, व्ही.डी.तनपुरे, भारती पेरणे,लक्ष्मी ऐटाळे, एस .ऐ.अंगारखे, जकीया इनामदार,मिनाश्री तुपे,भास्कर बुलाखे, हसन शेख, एस.बी.जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here