शिंगणापूर ग्रामपंचायत एक कोटी चाळीस लाखांचे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
कोपरगाव ; शिंगणापूर ग्रामपंचायतच्या वतीने १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी १३ विकास कामांचे लोकार्पण आणि १६ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची कर्मभूमी म्हणून शिंगणापूर गावाची ओळख आहे. अनेक लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन ग्रामपंचायत विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर ठरते आहे. स्व.कोल्हे यांच्या कार्यकाळात येसगावला आदर्श गाव पुरस्कार मिळाला होता त्या धर्तीवर विकासात्मक पथावर शिंगणापूर देखील आदर्श आणि अव्वल करण्यात आपणा सर्वांना यश येईल.ग्रामीण भागासाठी हक्काचा दलीत वस्तीसारखा निधी देखील राजकारण करून दिला जात नाही हे खेदजनक आहे. विरोधातील ग्रामपंचायत असेल तर त्यांना अडचणी देण्याचा प्रयत्न करणे हे संकुचित विचारांचे लक्षण आहे.
शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेला अडचणी देण्याचा प्रयत्न केला तरी सर्व गाव एक असल्याने बाहेरील घटक यात आपली पोळी भाजू शकत नाही.सकारात्मक धोरण ठेवत काम करणे हा आपला स्वभाव आहे.एकोप्याने गावाच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सर्वजण करतात त्यामुळे येणाऱ्या काळात कायापालट होऊन अधिक प्रभावी चित्र बदललेले दिसेल असा विश्वास यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच डॉ.विजय काळे, उपसरपंच सौ. रत्ना संवत्सरकर, माजी संचालक मच्छिंद्र लोणारी,दिपक गायकवाड,यादवराव संवत्सरकर,राजेंद्र लोणारी,भाऊलाल कुऱ्हे,दिगंबर कुऱ्हे,यशवंतराव संवत्सरकर,श्रीकांत संवत्सरकर,शामराव संवत्सरकर,संजय तुळसकर,दत्तूभाऊ संवत्सरकर,उदयभान आढाव,अविनाश संवत्सरकर,जालिंदर गीते,जालिंदर आढाव,दिलीपराव आढाव,रवींद्र लगड,बाळासाहेब सोनपसारे,मनोज इंगळे,शेखर कुऱ्हे,प्रमोद संवत्सरकर,समाधान कुऱ्हे,कैलास संवत्सरकर,अशोक वराट,गणेश राऊत,दिनकर मोरे,दिलीप चौखंडे,गौतम त्रिभुवन,माणिकराव कुऱ्हे,माणिकराव संवत्सरकर,सतिष निकम,मंगेश गायकवाड,सुनील भोसले,बद्रीनाथ घुमरे,भगवान संवत्सरकर,पंकज कुऱ्हे,विश्वास जानराव,बुधा हिरे,रंगनाथ संवत्सरकर,शेखर कुऱ्हे,सिद्धार्थ साठे,रोहित कनगरे,विशाल गोर्डे,कुणाल लोणारी,शुभम भावसार,ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे,शिंगणापूर ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य,काशिनाथ दादा लोणारी सोसायटीचे,चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सन्माननीय आजी-माजी सदस्य आदी मान्यवर तसेच सर्व महिला भगिनी व सर्व ग्रामस्थ, शिंगणापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.