कोळपेवाडी वार्ताहर :- मला जनसेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तीन हजार कोटीचा निधी खेचून आणला आहे. यामागे मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या बांधवांबरोबरच मुस्लीम समाज बांधवांचे मोठे पाठबळ पाठीशी असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील सर्व्हे नं. १०५ मधील अक्सा मस्जिदसाठी २५ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, मागील साडे चार वर्षात मतदार संघाच्या विकासाचे बहुतांश अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून तीन हजार कोटीचा निधी मिळविला असून कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावासारखे असे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.ज्याप्रमाणे कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकराव काळे यांनी सर्व समाजाला सोबत घेवून सर्व समाजघटकांचा विकास केला तो वारसा मी देखील पुढे चालवत आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या समाज मंदिराबरोबरच मुस्लीम समाजाला देखील मस्जिद, कब्रस्तानसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळात देखील मुस्लीम समाजाच्या मागणीनुसार आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. मुस्लीम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून यापुढील काळातही मुस्लीम समाजाचे प्रेम असेच अबाधित राहील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मौलाना आसिफ साहब, मौलाना मुख्तार साहब, मौलाना उबेद साहब, मौलाना निसार साहब, मौलाना हाफिज बशीर साहब, मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याअधिकारी मनोजकुमार पापडीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, मुस्लिम कमिटीचे तालुकाध्यक्ष अय्युब शेख, अय्युब मन्सूरी, जावेद शेख, अय्युब कच्छी, पप्पू सय्यद, अरबाज सय्यद, मुख्तार सर, सोहेल सर, युसूफ शेख, नतीम शेख, शकिल खाटीक, शफिक शेख, शागिर खाटीक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.