कोपरगाव :
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथे एका जाहिर कार्यक्रमात बोलताना एका राजकीय पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी १00 सिंधी कुत्ते मिलकर भी एक शेर का शिकार नहीं कर सकते असे जाहीर वक्तव्य केले.त्यांच्या या विधानामुळे संपुर्ण भारतातील सिंधी समाजात आव्हाडांविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात सर्व दुर त्यांच्या या वक्तव्यामुळे सिंधी समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहेत.
त्याचेच पडसाद म्हणुन कोपरगाव सिंधी समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जितेंद्र आव्हाड विरुद्ध FiR दाखल करून आव्हाड यांनी सिंधी समाजाची लेखी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर सर्वस्वी मनोहर कृष्णाणी,चेतन खुबाणी, रिंकेश खुबाणी, हरेश आर्य,विकी शर्मा, हरेश काराचीवाला, अमित शर्मा,राम आर्य,विनोद शर्मा,गौरव शर्मा,बबन आर्य आर्य,आशीष राजपाल,जितेश शर्मा,पंकज शर्मा,वलीरामानी बंधु,मुकेश शर्मा, गणेश नोतवानी,हर्षल कृष्णानी धीरज कराचीवाला,गणेश बालानी,संजय आर्य,दिपक आर्य आदी सिंधी बांधवांच्या सह्या आहेत.
सदरील निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व गृह मंत्री आदींना देखील पाठविण्यात आल्यात.