कोपरगाव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाला गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी उदंड प्रतिसाद देत आपले कर्तव्य बजवले.
सरपंच शकुंतला गुडघे , उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे , ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी दोन दिवस अगोदरच स्वच्छता अभियानासाठी गावातील युवक व ग्रामस्थांना आवाहन केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवले.ग्रामपंचायतचा परिसर, मारुती मंदिराचा परिसर, स्मशानभूमी परिसर, समाज मंदिर परिसर स्वच्छ करत काल ग्रामस्थांनी आपले कर्तव्य बजावले.यावेळी सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, ग्राम विकास अधिकारी भानुदास दाभाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, धर्मा जावळे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जावळे, चिलू जावळे,चिलुहनुमंता जावळे,किरण जावळे, हेमराज जावळे, बबलू जावळे, अंगणवाडी सेविका कांताबाई जावळे, लताबाई जावळे, सुनंदा खरात,सौ फटांगरे,सौ घोंगडे, सविता जावळे,आशा सेविका आशाताई फटांगरे, श्रीमती सोनवणे, श्रीमती चव्हाण,अलका गुडघे , भाऊसाहेब खरे, मच्छिंद्र गुडघे, पुंजाहरी आव्हाड आदी उपस्थित होते.